शनिवार, २१ जानेवारी, २०१२

इंटरनेटवरील मराठी विश्वकोशात 'संत कक्कय्या'

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाने 'मराठी विश्वकोश' इंटरनेटवर टाकणे सुरु केले आहे. आतापर्यंत ३ खंड प्रकाशित झाले आहेत. पुढील खंडही लवकरच इंटरनेटवर प्रकाशित होणार आहेत. इंटरनेटवरील मराठी विश्वकोशात खंड ३ - सूची ४ मध्ये 'संत कक्कय्या'चा 'कक्कय्य' या नोंदशीर्षकाखाली (विषय - धर्म) नोंद करण्यात आली आहे. त्यातील मजकूर समाज बांधवांसाठी जशाच्या तसा खाली देत आहे. 

कक्कय्य : (सु. १२ वे शतक). कर्नाटकात होऊन गेलेला एक वीरशैव संत. तो जातीने ढोर असून मूळचा माळव्याचा (मध्य प्रदेश) रहिवासी होता. बसवेश्वरांच्या वीरशैव पंथाची कीर्ती ऐकून तो बसवकल्याण येथे गेला व वीरशैव पंथ स्वीकारून त्याने पंथप्रचाराचे भरीव कार्य केले. वीरशैव पंथात त्याला उच्च स्थान आहे. स्वत: बसवेश्वर त्याला आपला आजोबा मानीत. कायकवे कैलासह्या वीरशैव तत्त्वास अनुसरून बसवकल्याण येथेही तो आपला परंपरागत व्यवसाय करून चरितार्थ चालवी. चेन्नबसवांसोबत उळवीस (जि. कारवार) जात असता, वाटेत कक्केरी येथे त्याने समाधी घेतली. त्याची काही कन्नड वचनेउपलब्ध आहेत. त्याचे अनुयायी कर्नाटकात व महाराष्ट्रात असून ते कक्कय्य समाजया नावाने ओळखले जातात.

मराठी विश्वकोशातील नोंद 'कक्कय्य' पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा